मारुतीची पहिली कार मारुती 800 पुन्हा एकदा रस्त्यावर धावण्यास तयार आहे. मारुती सुझुकीची पहिली कार 14 डिसेंबर 1983 ला लाँच झाली होती. ही कार इंडियन एअरलाइनचे कर्मचारी हरपाल सिंह यांनी खरेदी केली होती. स्वतः तत्तकालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या कारची चावी त्यांना सोपवली होती. मात्र वेळेनुसार या गाडीमध्ये अनेक खराबी आली व गाडी भंगारात बदलली.

पहिली मारुती 800 एएस80 अनेक दशके हरपाल सिंह यांच्याकडे होती. त्यावेळी याची किंमत 47500 रुपये होती. कार खराब झाल्यानंतर देखील अनेकांनी लाखो रुपये देऊन कार खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. 2010 मध्ये हरपाल सिंह यांच्या निधनानंतर कार तशीच पडून राहिली. आता एजीएम टेक्नोलॉजी नावाच्या कंपनीने पुन्हा एकदा कारचे रिस्टोरेशन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
आता ही कार पुर्णपणे रिस्टोर झाली आहे. आधीची कार पांढऱ्या रंगाची होती, मात्र आता कंपनीने याला क्लासिक लाल रंग दिला आहे. कारला आतून-बाहेरून पुर्णपणे बदलून टाकण्यात आले आहे.
रिस्टोरेशन कंपनीने कारचे एक्सटेरिअरला अशाप्रकारे डिझाईन केले आहे की, कारचा आयकॉनिक लूक देखील कायम राहिल व मॉर्डन देखील दिसेल. कारच्या समोरील बाजूला हेलाचे प्रोजेक्टर हेडलॅम्पस लावण्यात आलेले आहेत. तसेच हेडलॅम्पच्या हाउसिंगमध्येच डीआरएल आणि टर्न इंडिकेटर दिले आहेत. कंपनीने जुन्या ग्रिलच्या जागी नवीन ग्रिल दिली आहे.

12 इंच ट्यूबलेस टायर्ससोबत एलॉय व्हिल्स देण्यात आलेले आहेत. इंटेरिअरबद्दल सांगायचे तर यात जुन्या डॅशबोर्ड ऐवजी कार्बन फायबर फॉक्स कॅपिंग देण्यात आले आहे. इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील नवीन आहे. सीट्समध्ये देखील बदल करण्यात आले असून, पॉवर स्टेअरिंग आणि ब्रेक्स देण्यात आलेले आहे. आधीच्या मारुतीमध्ये हे फीचर नव्हते.

नवीन रिस्टोर मारुतीमध्ये स्टेरिओ, एअर कंडिशनर आणि 796 सीसी इंजिनमध्ये फ्यूल इंजेक्शन तंत्रासोबत ट्रिपल सिलेंडर एफ8डी पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. यामध्ये 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील दिला आहे. कार 36 वर्ष जुनी असली तरी देखील नवीन लुकमुळे कार जुनी असल्याचे वाटतच नाही. या कारच्या रिस्टोरेशनसाठी जवळपास 6 लाख रुपये खर्च आला.