घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी वापरा हे फिटनेस अ‍ॅप्स

नवीन वर्षात तुम्ही तंदरुस्त राहण्याचा, दररोज जिमला जाण्याचा संकल्प नक्की केला असेल. मात्र व्यायाम करण्यासाठी जिमला जाण्याची किंवा खूप जास्त इक्विपमेंट असण्याचीच गरज नाही. असे अनेक अ‍ॅप आहेत, जे शरीराच्या वजन अर्थात बॉडी वेटद्वारे कोणते व्यायाम करायचे ते योग्य पद्धतीने सांगतात. अशाच काही अ‍ॅपविषयी जाणून घेऊया.

बॉडबोट पर्सनल ट्रेनर –

हे अ‍ॅप तुमच्यासाठी एक डिजिटल पर्सनल ट्रेनर ठरू शकते. हे तुमच्या गोलनुसार तुम्हाला वर्कआउट देते. बॉडीवेट नुसार तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर तुम्हाला या अ‍ॅपमध्ये अनेक व्यायाम मिळतील. आधी हे तुमचे वजन आणि उंचीचे विश्लेषण करते व त्या हिशोबाने शरीराच्या कोणत्या भागावर लक्ष देणे गरजेचे हे सुचवते. येथे प्रत्येक व्यायामासाठी गाईड करण्यात येते. अँड्राईड आणि आयओएस डिव्हाईससाठी तुम्ही हे अॅप डाउनलोड करू शकता.

फ्रीलेक्टिक्स ट्रेनिंग कोच –

वजन कमी करायचे असेल, अथवा बॉडी बनवायची असेल तर या अ‍ॅपवर तुम्हाला प्रत्येक प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम मिळतील. यामध्ये 5-30 मिनिटांचे वर्कआउट प्लॅन्स आहेत. यात मसल्ससाठी 900 पेक्षा अधिक वेगवेगळ वर्कआउट आहेत.

या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रत्येक प्रकारच्या गटातील लोकांसाठी व्यायाम आहेत. सोबतच व्यायामाचे व्हिडीओ ट्युटोरियल्स देखील आहेत. तुम्ही वर्कआउट शेड्यूल देखील करू शकता. हे अ‍ॅप अँड्राईड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

कीप ट्रेनर –

जर तुम्हाला घरी व्यायाम करण्यासाठी एखाद्या असिस्टेंटची आवश्यकता असेल, तर तुम्ही हे अ‍ॅप वापरू शकता. येथे व्यायाम करण्यासाठी इक्विपमेंटची गरज नाही. यात 400 पेक्षा अधिक व्यायाम देण्यात आलेले आहेत. यात फॅट बर्निंग, वेट लॉस, मसल्स, कार्डिओ, अ‍ॅब रिपर वर्कआउट एब्स ट्रेनिंग, स्ट्रेंथ इत्यादी वर्कआउट मिळतील. यात पर्सनलाइज्ड ट्रेनिंग प्रोग्राम्स देखील देण्यात आलेले आहेत. हे अ‍ॅप अँड्राईड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment