मिसाईल मॅन डॉ.कलाम यांच्या भूमिकेत परेश रावळ


बॉलीवूडच्या बायोपिक लाटेत आणखी एका बायोपिकची सुरवात होत आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, वैज्ञानिक आणि मिसाईल मॅन अशी ओळख असलेले महान शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा झाली असून बॉलीवूडचा गुणी आणि लोकप्रिय अभिनेता परेश रावळ डॉ. कलाम यांची भूमिका साकारणार आहेत.

स्वतः परेश रावळ यांनीच या संदर्भात त्यांच्या ट्विटर अकौंट वरून ही माहिती दिली असून मिसाईल मॅन कलाम यांचा उल्लेख संत कलाम असा केला आहे. ते लिहितात डॉ. कलाम यांची भूमिका साकारायला मिळणे हे माझे मोठे भाग्य आहे. यापूर्वी परेश रावळ यांनी पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र विवेक ओबेराय याच्याकडे ती भूमिका गेली होती. रावळ गेल्या लोकसभेत अहमदाबाद मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. या वेळी त्यांनी निवडणूक लढविली नव्हती. रावळ यांनी त्याचे सारे लक्ष पुन्हा अभिनयावर केंद्रित केले आहे.

Leave a Comment