मशिदीच्या पुढाकाराने होणार हिंदू मुलीचा विवाह


फोटो सौजन्य मनोरमा
केरळ मधील अलापुझ्झी जिल्ह्यातील कयामकुलम मशिदीत एका हिंदू मुलीचा हिंदू पद्धतीने विवाहसोहळा संपन्न होत असून त्याची जबाबदारी चेरुवल्ली मुस्लीम जमात समितीने स्वीकारली आहे. या निमित्ताने सर्वधर्म समभाव आणि धार्मिक साहिष्णूतेचे दर्शन देशाला घडत आहे. हा विवाह १९ जानेवारीला हिंदू विवाह पद्धतीनुसार होत असून या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार २२ वर्षीय अंजू आणि शरत शशी यांचा विवाह होत आहे. अंजू हिच्या घराची परिस्थिती बेताची आहे. तिच्या वडिलांचे वर्षापूर्वी निधन झाले आहे. तिच्या आईला अंजूच्या विवाहासाठी कुठून पैसे आणणार अशी चिंता सतावत होती. त्याच्या शेजारी राहणारे चेरुवल्ली मुस्लीम जमात समितीचे सचिव नुजुमुद्दिन अलुमुरीयल यांनी मदतीची तयारी दाखविली त्याला अंजूच्या आईने होकार दिला. त्यानंतर मशिदीत या मदतीची माहिती दिली गेली तेव्हा नमाजासाठी आलेल्या लोकानी आर्थिक सहकार्याची तयारी दाखविली.

शेकडो हातानी केलेल्या या मदतीमुळे अंजूच्या लग्नाचा खर्च शक्य झाला असून मुस्लीम जमात समितीने या निमित्ताने १ हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. तसेच अंजूसाठी १० तोळे सोने आणि २ लाख रुपये वरदक्षिणा दिली जात आहे असे समजते.

Leave a Comment