बांद्रा वर्सोवा १७ किमी लांबीच्या सी लिंकचे काम सुरु


मुंबईच्या बांद्रा वर्सोवा या दुसऱ्या सी लिंकचे काम सुरु झाले असले तरी हे काम अजूनतरी मंद गतीने सुरु असल्याचे समजते. नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या कामात आत्तापर्यंत बांद्रा भागातील बेस पिलर्सचे काम झाले असून असे एकूण ५ हजार पिलर्स बांधायचे आहेत. त्यातील १ हजार पिलर्स समुद्रात असणार आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात प्रवाशांना ज्या भयंकर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते त्यावर या सी लिंक नंतर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविता येणार आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळांच्या या १७ किमी लांबीच्या सी लिंकचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. या आठ पदरी मार्गाच्या उभारणीसाठी ११३३२ कोटी रुपये खर्च येणार आहे त्यातील ६९९४ कोटी रुपये केवळ सीलिंक साठी खर्च होणार आहेत. हे काम अनिल अंबानी यांच्या रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चरकडे असून इटलीच्या कंपनीचे सहाय्य त्यासाठी घेतले गेले आहे. बांद्रा वर्सोवा सीलिंक सुरु झाल्यावर हा ५० मिनिटांचा प्रवास अवघ्या १० मिनिटात करता येणार आहे. वांद्रा वर्सोवा मार्गावर दररोज हजारो वाहने प्रवास करतात.

Leave a Comment