तुमच्या उपयोगाची काही मनोरंजक माहिती


ट्विटर आजकाल बहुतेक सारे वापरतात. सेलेब्रिटीपासून सर्वसामान्य युजर ट्विटरवर व्यक्त होण्यास अधिक पसंती देतो. पण या ट्विटरचे होम बटन एक बर्ड हाउस आहे हे तुम्ही नोटीस केले आहे का? आणि जेव्हा तुम्ही ट्विटर जॉईन करता तेव्हा तुम्ही एक अंडे असता. ट्विटरचा लोगो लारा नावाचा पक्षी आहे.

रशियन टीव्हीवर एक गेम आहे तो कार चोरीशी संबंधित आहे. यात प्लेअर कार चोरल्यावर ३५ मिनिटे पोलिसांच्या ताब्यात न सापडता काढू शकला तर कार प्लेअरच्या मालकीची होते. रात्री उशिरा झोपण्यावरून तुम्हाला घरात बोलणी खावी लागत असली तर हे लक्षात घ्या, रात्री लवकर झोपणाऱ्यांच्या तुलनेत उशिरा झोपणारे अधिक बुद्धिमान असतात. तुमचा आहार कमी असेल तर तुम्ही अधिक जगता. खरे बोलताना माणूस जास्त हातवारे करतो पण हेच तो थापा मारत असेल तर त्याचे हातवारे फारसे होत नाहीत.


सकाळी झोपेतून जाग यावी म्हणून अनेकजण घड्याळाचा किंवा मोबाईलवरच गजर लावतात. हा अलार्म जर तुमच्या मोबाईल रिंगटोन सारखा असेल तर तुम्ही गजर वाजताच चटकन उठता असे आढळून आले आहे. असेही दिसून आले आहे की ९३ टक्के विध्यार्थी ऑनलाईन रिसर्च करतात, लायब्ररीत नाही. स्कूल हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेतून आला असून त्याचा अर्थ आहे मोकळा वेळ.

पुरुष महिलांच्या तुलनेत बारीक अक्षरे अधिक चांगली वाचू शकतात पण ऐकण्याच्या बाबतीत मात्र महिलांचे कान अधिक तीक्ष्ण असतात. युवा मुलांनी आळशीपणा करणे हे वाईट लक्षण समजले जाते पण खरी बाब अशी की आळशीपणा हे किशोरावस्थेचे एक सामान्य लक्षण आहे. त्यामुळे या वर्तणुकीला वाईट श्रेणी देणे योग्य नाही.

शेवटचे आणि महत्वाचे. आता परीक्षांचा सिझन सुरु होत आहे. तेव्हा एक लक्षात ठेवा. अभ्यास करत असताना तुम्ही ज्या स्वादाचा किंवा फ्लेवरचा च्युइंगम खात असाल त्याच फ्लेवरचा च्युइंगम परीक्षा देताना चघळा. वाचलेले लवकर आठवायला हे उपयोगी पडते.

Leave a Comment