कपिलने उलगडले नटराज शॉटचे रहस्य


भारताला पहिलावहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा टीम इंडियाचा कप्तान कपिल देव याने नटराज शॉटमागचे रहस्य उलगडले आहे. वास्तविक हा पूल शॉट पण कपिलने जेव्हा तो वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात फटकावला तेव्हापासून तो नटराज शॉट नावाने प्रसिद्ध झाला आहे. बहुतेक सर्व फलंदाज हा शॉट खेळतात.

कपिलला एका मुलाखतीत सर्वात छान नटराज शॉट मारणारा खेळाडू कोण असा प्रश्न विचारल्यावर त्याने सगळेच खेळाडू हा शॉट चांगला मारतात पण रोहित शर्माला हा शॉट मारताना अनेकदा पाहिल्याचे त्याने सांगितले. या शॉटला नटराज नाव कसे मिळाले याविषयी बोलताना कपिल म्हणाला, खरे खोटे मला नक्की माहित नाही. पण जेव्हा मी हा शॉट वर्ल्ड कप मध्ये मारला आणि आम्ही जिंकलो तेव्हा एका दाक्षिणात्य लेखकाने नटराजाच्या फोटो सोबत माझा या शॉट मधील फोटो प्रकाशित केला होता. तेव्हापासून हा नटराज शॉट म्हणून प्रसिद्ध झाला. मी कोणताच शॉट मैदानावर ठरवून खेळत नाही. खेळताना ते आपोआप घडते. ८३ या वर्ल्ड कपवर येत असलेल्या चित्रपटात कपिलची भूमिका करत असलेल्या रणवीरसिंगनेही हा शॉट अप्रतिम मारला आहे.

कसोटी क्रिकेट चार दिवसाचे करावे काय या बाबत मत देताना कपिलने ५ दिवसांची कसोटी ही क्रिकेट परंपरा आहे. तुम्ही क्रिकेटचे प्रारूप बदलू शकता पण जुन्हा परंपरा जिवंत ठेवायला हव्यात. जुन्या परंपराशी छेडछाड करण्यापेक्षा जास्त संख्येने प्रेक्षक स्टेडियममध्ये कसे येतील यासाठी प्रयत्न व्हावेत असेही तो म्हणाला.

Leave a Comment