.. म्हणून टेकऑफ आणि लँडिंग वेळी विमानातील लाईट करण्यात येते बंद

विमानातून प्रवास करताना प्रवाशांना अनेक नियम पाळावे लागतात. प्रवासी विमानात बसल्यानंतर त्यांना अनेक नियम समजवले जातात. यातीलच एक नियम म्हणजे सीट बेल्ट लावणे. अनेक नियम तर असे आहेत, ज्याच्या मागील अर्थच कळत नसतो. असाच एक नियम म्हणजे विमान टेकऑफ आणि लँडिंग करत असताना कॅबिनमधील लाईट कमी करणे. हा नियम का आहे, याविषयी जाणून घेऊया.

विमान टेकऑफ आणि लँडिंग करत असताना कॅबिनमधील लाईट कमी करण्याचा नियम आहे. यामागील कारण असे आहे की, आपल्या डोळ्यांना अंधाराची सवय व्हावी यासाठी असतो. आपल्या डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी 10 ते 30 मिनिटे लागतात. आपतकालिन परिस्थितीत विमान खाली करताना ही काही मिनिटे अनेक बदल घडवतात.

पायलट आणि कॉकपिट कॉन्फेडेंशियल पुस्तकाचे लेखक पॅट्रिक स्मिथ यांनी सांगितले की, प्रकाश कमी केल्याने आपल्या डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे जर अचानक काही घडले आणि लाईट गेली तर तुमच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी येत नाही व तुम्ही दरवाजाकडे जाऊ शकता.

ते म्हणाले की, अशावेळी आपतकालिन रस्ता आणि चिन्हे देखील कमी प्रकाशात आणि अंधारात स्पष्टपणे दिसतात. टेकऑफ आणि लँडिंग करताना कॅबिनमधील प्रकाश कमी करण्याचे आणखी एक कारण म्हणजे, याच वेळी सर्वाधिक अपघात होतात.

Leave a Comment