5600 रुपयांच्या बिलावर महिला वेटरला मिळाली 1.44 लाखांची टीप

2020 टीप चँलेज सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या चँलेंजची एकमेव अट म्हणजे नवीन वर्ष 2020 च्या आकड्यांनुसार, हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तेवढ्याच रक्कमेची टीप द्यायची. अमेरिकन गायक डॉनी व्हॅलबर्गने देखील याच चँलेंज अंतर्गत एका महिलेचे नवीन वर्ष खास बनवले आहे.

आयएचओपी नावाच्या एका हॉटेलमध्ये डॉनीने या चँलेंज अंतर्गत 78.45 डॉलर्सच्या बिलासाठी महिला वेटरला तब्बल 2020 डॉलर्सची (जवळपास 1.4 लाख रुपये) टीप दिली आहे.

डॉनींच्या या टीपमुळे महिला वेटर बेथेनी प्रोव्हेनचरचे देखील मन भरून आले.  बेथेनी म्हणाली की, एखाद्या व्यक्तीकडून मिळालेला हा सर्वात मोठा आशिर्वाद आहे.

या बिलाचा फोटो डॉनी यांची पत्नी जेनी मॅकर्थी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2020 टीप चँलेंज अंतर्गत या सारख्याच अनेक बिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

Leave a Comment