चहा पिण्याचे हे आहेत फायदे

चहा हे जगात सर्वाधिक पिले जाणारे पेय आहे. कोणत्याही काळात, हवामानात गरमागरम चहाचा आनंद घेणे अनेकांना आवडते. चहामुळे उत्साह निर्माण होतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवतो कोणी आले टाकून बनवते तर कोणी वेलची, दालचिनी टाकून बनवते. तर अनेकजण विना दुधाचा देखील चहा पितात. चहा कसाही असो, त्याचे अनेक फायदे आहेत.

अधिक चहा पिणे आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे सांगितले जाते. मात्र या उलट चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

ह्रदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी  –

दररोज चहा पिणे ह्रदयासाठी फायदेशीर ठरते. यामुळे ह्रदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. चार पेक्षा अधिक ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते.

अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स –

ब्लॅक आण ग्रीन टीमध्ये फळे आणि पालेभाज्यांच्या प्रमाणात 10 पट अधिक अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय कॅमेलिया टी प्लांटमध्ये पॉलीफेनॉलचे प्रमाण अधिक असते.

हाडे मजबूतीसाठी –

ग्रीन टीच्या सेवनामुळे खनिजांचे उत्सर्जन होते, जे हाडे निर्मिती होते व हाडांना नुकसान पोहचवणाऱ्या पेशींना देखील रोखते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –

अ‍ॅण्टीऑक्सिडंट्समुळे वजन कमी होण्यास मदत होते. कॅटेचिन आणि जिनसेंगमुळे चरबी कमी होते व मेटाबॉलिझम सुधारते.

तणाव कमी होण्यास मदत –

काही हर्बल चहा जसे की, कॅमोमाइल टीमुळे (chamomile tea) ताणतणाव, थकवा, चिंता दूर होण्यास मदत होते.

 सतर्कता व उत्साह वाढवण्यास मदत –

चहामधील एल-थॅनॅनिन आणि कॅफेनमुळे सतर्कता आणि उत्साह वाढतो. त्यामुळे पुढील वेळेस चहाचे सेवन करताना एक कप चहा अधिक पिण्यास विसरू नका.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment