पोस्टाच्या ‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’ योजनेविषयी जाणून घ्या सर्वकाही

भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना आहेत. सरकारच्या अंतर्गत येणारेपोस्ट ऑफिसद्वारे 9 बचत योजना येतात. देशभरात 1.5 लाख शाखांमध्ये या योजना उघडता येतात. या योजनांमध्ये मुदत ठेव खाते, राष्ट्रीय बचत वेळ खाते, राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना, वरिष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (VIII इश्यू), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी खाते या योजना आहेत.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (VIII इश्यू) ही बचत योजना देखील पोस्ट ऑफिस अंतर्गत येते. यामध्ये ग्राहक 1000 रुपये गुंतवणूक करू शकता व नंतर 100 रुपये अथवा त्याहून अधिक कितीही गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

व्याज दर –

या योजनेवर 7.9 टक्के दराने व्याज दिले जाते. हे व्याज वार्षिक मोजले जाते, मात्र योजनेची मुदत संपल्यानंतर दिले जाते.  म्हणजेच 5 वर्षानंतर तुम्हाला 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर 146.25 रुपये मिळतील.

करात सवलत –

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदाराला आयकर कायद्यातील सेक्शन 80सी अंतर्गत फायदा होतो.

गुंतवणुकीसाठी पात्रता –

एक प्रौढ गुंतवणूकदार स्वतःसाठी हे प्रमाणपत्र घेऊ शकता याशिवाय अज्ञान व्यक्तीसाठी देखील प्रमाणपत्र घेता येतात.

प्रमाणपत्राचे हस्तांतरण –

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे दुसऱ्याला हस्तांतरण करता येते. प्रमाणपत्रावरच जुन्या गुंतवणूकदाराच्या ऐवजी नवीन गुंतवणूकदाराचे नाव येते.

Leave a Comment