Video : या फलंदाजाने ठोकले एकाच षटकात 6 षटकार

एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याची युवराज सिंहची कामगिरी आजही अनेकांच्या लक्षात आहे. अशीच कामगिरी न्युझीलंडच्या एका फलंदाजाने केली आहे.न्युझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने न्युझीलंडच्या सुपर स्मॅश टी20 लीगमध्ये एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकत इतिहास रचला आहे. कँटरबरी किंग्सकडून खेळताना कार्टरने नॉर्थरने नाइट्सविरुद्धच्या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारले. स्पिनर एंटॉन देवसिचच्या गोलंदाजीवर त्याने प्रत्येक बॉल बाँड्री लाईनच्या बाहेर पाठवला.

नॉर्थन नाइट्सच्या 220 धावांचा पाठलाग करताना कँटरबरी किंग्सने 104 धावावंर 3 विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर मैदानात आलेल्या कार्टरने 15 व्या षटकात एंटॉन देवसिचला प्रत्येक बॉलवर षटकार ठोकले. कार्टरने या सामन्यात 29 बॉलमध्ये 70 धावा केल्या. या सामन्यात कार्टरच्या संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला.

एकाच षटकात 6 षटकार ठोकणारा कार्टर 7वा खेळाडू ठरला आहे. टी20 मध्ये याआधी युवराज सिंह, रॉस वाइटले आणि हजरतुल्ला जेजई यांनी अशी कामगिरी केली आहे. तर एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्स व फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रवि शास्त्री आणि सर गॅरी सोबर्स यांनी ही कामगिरी केलेली आहे.

Leave a Comment