Video : विचित्र पद्धतीने बाद झाला जेम्स पॅटिन्सन

न्युझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या दुहेरी शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 454 धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेम्स पॅटिंन्सनबरोबर विचित्र घटना पाहिला मिळाली. सामन्यात पॅटिन्सन विचित्र पद्धतीने बाद झाला.

न्युझीलंडचा गोलंदाज नील वॅगनरच्या बॉलवर पॅटिन्सन बॉल सोडण्यासाठी खाली वाकला. त्याला वाटले बाउंसर येईल, मात्र बॉल बाउंसच झाला नाही. बॉल पॅटिन्सनच्या खांद्याला लागला, त्यानंतर ग्लब्झला व बॅटला लागून थेट स्टॅम्पला धडकला. पॅटिन्सनने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही व तो विचित्र पद्धतीने बाद झाला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या 454 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडने दुसऱ्या दिवशी एकही विकेट न गमवता 63 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॉबुशेनने 363 बॉलमध्ये 19 चौकर आणि 1 षटकाराच्या साहय्याने 215 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

Leave a Comment