भारतातील या विमानतळावर आहे सर्वात मोठी नर्सरी

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील सर्वात मोठी औषधीय नर्सरी तयार करण्यात आली आहे. यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी होईल व ऑक्सिजनची मात्रा वाढेल. या नर्सरीमध्ये दिवस-रात्र ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात आलेली आहे. यामध्ये तुळस, एलोवेरा, स्नॅक प्लांट ही प्रमुख झाडे आहेत.

विमानतळावर दरदिवशी 36 हजार सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. यामुळे झांड्यांच्या सिंचनासाठी पेय जलाची बचत केली जाते. दिल्ली विमानतळाच्या सीईओंनी सांगितले की, नर्सरीमध्ये स्प्रिंकलरद्वारे सिंचन केले जाते. यामुळे धुळ उडत नाही व वायू प्रदुषण कमी होते.

या विमानतळावर प्रवाशांना 2022 पर्यंत एअर ट्रेनची सुविधा मिळेल. यामुळे प्रवाशांना एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी सोपे होईल व वेळ देखील वाचेल. या संपुर्ण सेवेला सुरू करण्यासाठी जवळपास 2500 कोटी रुपये खर्च येईल. सध्या शिकागो, शंघाई आणि फ्रेकफर्ट या ठिकाणी एअर ट्रेनची सुविधा आहे. सध्या दिल्ली विमानतळावर शटल बस सेवा उपलब्ध आहे.

Leave a Comment