या व्यक्तीने 4000 तासात हाताने तयार केला उत्तर अमेरिका खंडाचा नकाशा

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे राहणाऱ्या एंटन थॉमस या कार्टोग्राफरने (मानचित्र तयार करणारा) जवळपास 5 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर उत्तर अमेरिका खंडाचे मानचित्र तयार केले आहे. हाताने मानचित्र काढण्याची कला समाप्त होत चालली असताना या कलाकारने ही कामगिरी केली आहे. त्याने 4 फूट लांब आणि 5 फूट रुंद खंडाचे मानचित्र तयार केले आहे. यामध्ये त्याने 600 शहरांशिवाय अगदी बारीक माहिती चिन्हांसह दिली आहे.

Image Credited – Bhaskar

थॉमसने सांगितले की, त्याने 64 हजार किलोमीटरची किनारपट्टीची रचना , जवळपास 25 कोटी वर्ग किलोमीटरच्या खंडावरील पर्वतीय श्रृखंला, जंगल, वाळवंट आणि आर्कटिक कॅनडाच्या ट्रुंडाला देखील चित्रित केले आहे. एंटनने नकाशात 600 शहरांसोबतच खंडाची संस्कृती, हवामान, वन्य जीवन, भू-भाग, हवामानाची दिशा आणि जनसंख्या देखील दर्शवली आहे. यासाठी नकाशात अनेक प्रतिक चिन्हांचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये इमारत, धव्ज, पक्षी, नाव, समुद्री जहाज, मासे यांना चित्रित केले आहे.

थॉमसने 2014 मध्ये मानचित्र काढण्यास सुरूवात केली. त्याने काही काळ मानचित्र सोडून संगीत आणि गाणी देखील लिहिली. तो आता मानचित्राच्या विक्रीसाठी प्रिंट काढण्याची योजना बनवत आहे.

Leave a Comment