चाहत्याने दिली कोहलीला अनोखी भेट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहे. हे चाहते विराटसाठी अनेक गोष्टी करत असतात. काही दिवसांपुर्वीच एका चाहत्याने संपुर्ण शरीरावर विराटचे टॅटू काढल्याचे समोर आले होते.

आता एका चाहत्याने जुन्या मोबाईलच्या पार्ट्सपासून विराटचे सुंदर पोट्रेट तयार केले आहे. बीसीसीआयने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. विराटने या चाहत्याची भेट घेतली व त्याच्या या सुंदर पोट्रेटवर सही देखील केली.

या व्हिडीओमध्ये चाहत्याने सांगितले की, तो गुव्हाटीवरून आहे व त्याला हे पोट्रेट बनविण्यासाठी 3 दिवस आणि 3 रात्र लागले.

विराटला भेटल्याचा आनंद चाहत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, आजपासून भारत आणि श्रीलंकामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. यातील पहिला सामना गुवाहाटीत खेळला जाणार आहे.

Leave a Comment