…तर अमेरिका इराणच्या 52 ठिकाणांवर हल्ला करणार – ट्रम्प

मागील शुक्रवारी अमेरिकेने इराणच्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात इराणच्या रिवॉल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी मारले गेले. यानंतर इराणने देखील अमेरिकाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी चेतावणी दिली आहे.

आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत इशारा दिला आहे आहे की, इराणने जर कोणत्याही अमेरिकन नागरिक आणि संपत्तीवर हल्ला केला तर अमेरिका इराणच्या 52 ठिकाणांवर हल्ला केला जाईल.

ड्रोन हल्ल्याचे समर्थन करत ट्रम्प यांनी ट्विट केले की, 52 हा आकडा यासाठी की 1979 मध्ये तेहरान येथील अमेरिकन दुतावासात 52 अमेरिकन्सला ओलिस ठेवण्यात आले होते.

ट्रम्प यांनी सांगितले की, या ठिकाणांमधील काही स्थळं इराणसाठी खूप महत्त्वाची आहेत, सांस्कृतिक ठिकाणे आहेत. येथे खूप जलद आणि मोठा हल्ला केला जाईल. अमेरिकेला आता कोणत्याही धमक्या नको आहेत.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने देखील हल्ल्याला प्रत्युत्तर देताना बगदादमधील अमेरिकन दुतावास आणि अल-बालाड एअरबेसवर रॉकेट हल्ले केले आहेत.

Leave a Comment