या आहेत जगातील सर्वात वयोवृद्ध महिला, वय ऐकून थक्क व्हाल

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला केन तनाका यांनी नुकताच दक्षिण जापानमधील आपल्या नर्सिंग होममध्ये 117 वा वाढदिवस साजरा केला. 2 जानेवारीला केन यांनी नर्सिंग होममधील मित्र-मैत्रिणी आणि कर्मचाऱ्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला.

मागील वर्षी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने केन यांना जगातील सर्वात वयोवृद्ध जिवित व्यक्ती घोषित केले होते. त्यांचा जन्म 1903 ला झाला होता व हिडेओ टंका यांच्यासोबत वर्ष 1922 मध्ये त्यांनी लग्न केले होते. या जोडप्याला 4 मुले असून एक मुल त्यांनी दत्तक घेतले आहे.

केन तनाका यांचे हे विक्रमी वय जापानसाठी एक प्रतिकात्मक झाले आहे. कारण मागील काही वर्षात जापानमधील जन्मदर सातत्याने घसरत चालला आहे. ज्यामुळे तेथे कामासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असून, यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment