संघाची संविधानाच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटवण्याची मागणी


नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाच्या संविधानामधून धर्मनिरपेक्ष हा शब्द हटवण्याची मागणी केली आहे. हा मुद्दा संघाचे नेते नंदकुमार यांनी उचलून धरला आहे. नंदकुमार यांचे असे म्हणणे आहे की, धर्मनिरपेक्ष या शब्दावर भारताने पुन्हा विचार करावा. तर पाश्चिमात्यांकडून हा शब्द आल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तविकरित्या पोप यांच्या प्रभुत्वाच्या विरोधात आहे.

नंदकुमार यांनी धर्मनिरपेक्ष या मुद्द्यावर संघाच्या पुस्तक प्रदर्शन सोहळ्यावेळी भाष्य केले. त्यांनी यावेळी असे म्हटले की, धर्मनिरपेक्ष या शब्दाची भारतात गरज नसल्यामुळे धर्मनिरपेक्ष याबाबत बोर्ड लावण्याची खरच गरज आहे का? काम, व्यवहार आणि भुमिकेच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट सिद्ध करुन दाखवावी लागणार आहे. त्याचसोबत संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाच्या अस्तिवाची गरज नसून ते संविधानाच्या संस्थापकांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असे ही म्हटले की, बाबासाहेब आंबेडकर, कृष्ण स्वामी अय्यर यांच्या अन्य जणांनी सुद्धा याच्या विरोधात आवाज उठवला होता. तर इंदिरा गांधी यांनी 1976 मध्ये जेव्हा धर्मनिरपेक्ष शब्दावर जोर दिला त्यावेळी आंबेडकर यांनी त्याचा अस्विकार केला होता. तर संघ संविधानामधील प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी भाजपवर दबाब टाकू शकतो.

Leave a Comment