काव्या कोप्पार्पूची दूर”दृष्टी’


काव्या कोप्पार्पू या सोळा वर्षाच्या मुलीने गंभीर नेत्ररोगांची लक्षणे शोधणारे एक ऍप विकसित केले आहे. या ऍपचे नाव “ऍग्नोसिस’ असे आहे. काव्याने आपला लहान भाऊ आणि एका वर्गमित्राच्या मदतीने हे ऍप विकसित केले आहे. काव्याने संगणकीय कौशल्यांच्या साहाय्याने मधुमेह रोगप्रतिबंधक औषधोपचाराने आपल्या आजोबांची दृष्टी वाचविली.

हे ऍप एका थ्रीडी प्रिंटेड लेन्सच्या साहाय्याने रेटिनाची एक इमेज काढून स्मार्टफोनमध्ये घेते. या प्रक्रियेवर हजारो डॉलर खर्च होत होते. काव्याने कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या साह्याने एक डिव्हाईस तयार केले ज्यामधून मधुमेहाचा रेटिनावर किती परिणाम झाला आहे हे एका छायाचित्रात समजते. या डिव्हाईसमुळे योग्यवेळी रोगाचे गांभीर्य लक्षात आल्याने लवकर त्याचे निदान करणे सोपे जाते. मुख्य म्हणजे मधुमेहामुळे ज्या रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम होणार आहे ते वाचू शकते.

काव्याने तिचा हा प्रकल्प न्यूयॉर्क येथे होणाऱ्या एका परिषदेत सादर केला. “ओ’रियली आर्टिफिशल इंटेलिजन्स’या परिषदेत काव्याला पारितोषिक मिळाले असून तिचे प्रचंड कौतुक झाले. अमेरिकेतील प्रख्यात दृष्टीतज्ज्ञ जे.फिल्डिंग यांनी या परिषदेत बोलताना सांगितले की, या मुलांनी अतिशय चांगल्या पध्दतीने स्वस्त आणि सोप्या मार्गाची निवड करून या ऍपची निर्मिती केली आहे. मात्र आता त्यांच्या प्रवासाची सुरवात झाली आहे. यापुढे अधिकाधिक क्‍लिनिकल डेटा मिळवून

हे ऍप विविध परिस्थितीत तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील रुग्णालयांसाठी कसे उपयुक्‍त करता येईल हे सिध्द करायचे आहे. काव्या “गर्ल कम्प्युटर लीग’ची संस्थापक आणि मुख्य कार्यकारी आधिकारी आहे. या माध्यमातून ती कम्प्युटर सायन्स विषयाबाबत किती पॅशेनेटेड आहे हे समजते. या समूहाच्या माध्यमातून ती महिला आणि मुलींना या क्षेत्रातील जगभरात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती करून देते. ऍग्नोसिस या ऍपच्या
मध्यमातून तिने मधुमेह रुग्णांसाठी खूप मोठे पाऊल उचलले असून आता आपल्या बरोबरच्या मुलींनादेखील तिने नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment