नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांची 20 अब्ज मेसेजची देवाण-घेवाण


नवीन वर्षाच्या दिवशी तुम्हीसुद्धा एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला नववर्षाच्या शुभेच्छा देणार मेसेज पाठवला असेलच. पण नवीन वर्षाच्या निमित्ताने भारतीयांनी किती व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवले हे तुम्हाला माहिती आहे काय? व्हॉट्सअॅपने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यानुसार नवीन वर्ष 2020 च्या पूर्वसंध्येला जगभरात 100 अब्ज व्हॉट्सअॅप संदेश पाठविण्यात आले.

आश्चर्यकारक गोष्ट अशी की 100 अब्जपैकी 20 अब्ज संदेश केवळ एकट्या भारतातूनच आले आहेत. एका दिवसात सर्वाधिक संदेश पाठविण्याचे रेकॉर्ड व्हाट्सअॅपच्या इतिहासातील विक्रम बनला आहे. जगभरातून पाठविलेल्या मेसेजमध्ये 12 अब्ज फोटो आहेत. व्हॉट्सअॅपच्या अहवालानुसार हे सर्व संदेश 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाठविण्यात आले आहेत. भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या 40 कोटींच्या पार गेली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच जाहिरातांना सुरुवात होऊ शकते. 2018 पासून याची चर्चा आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील जाहिराती जसे स्टेटस सेक्शनमध्ये दर्शविल्या जातील त्याप्रमाणे फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये दर्शविल्या जातील. जाहिरातीचे स्वरूप व्हिडिओ आणि फोटो असू शकते. व्हॉट्सअ‍ॅपवरील जाहिराती फेसबुकच्या जाहिरात कार्यक्रमाचा भाग असतील. याची पुष्टीही व्हॉट्सअ‍ॅपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट इडिमा यांनी केली.

Leave a Comment