स्वच्छ नजरेचे वर्ष २०२०


आपण नवीन वर्षात म्हणजे २०२० मध्ये प्रवेश केला आहे. नवीन वर्ष कसे जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अनेकांनी राशिभविष्य पाहून स्वतःपुरते तरी नवीन वर्ष कसे असेल याचा अंदाज घेतला असेलच. पण या नव्या वर्षाचा म्हणजे २०२० चा इंग्लिश डिक्शनरी मध्ये देण्यात आलेला अर्थ अनेकांनी पाहिला नसेल. या आकड्याचा इंग्लिश डिक्शनरीमधला अर्थ फार महत्वाचा आहे आणि तो आहे माणसाच्या दृष्टीसंदर्भात. अर्थात हा आकडा शब्दकोशात ट्वेन्टी ट्वेन्टी असा लिहिला गेला आहे.

या ट्वेन्टी ट्वेन्टी चा अर्थ आहे स्वच्छ किंवा निकोप दृष्टी. म्हणजे तुमचे डोळे उत्तम नजरेचे आहेत. डोळ्याची क्षमता मोजण्याचे हे परिमाण. अमेरिकन ऑप्टोमेट्रिक सोसायटी नुसार २०/२० म्हणजे नुसत्या डोळ्यांनी २० फुट दूरवरचे स्पष्ट पाहू शकणारे डोळे. डोळे तपासताना तुमच्या दृष्टीची क्षमता मोजण्याची ही योग्य पद्धत. त्यामुळे सोशल मीडियावर २०२० चा उल्लेख स्पष्ट दृष्टीचे वर्ष असा होत आहे.

सर्वप्रथम या संज्ञेचा वापर १८७५ मध्ये केला गेला तो मानवी डोळ्यांच्या संदर्भात. ख्रिश्चन धर्मियात या आकड्याला धार्मिक महत्व आहे. हा नंबर देवदूत म्हणजे एँजलचा मानला जातो. हा नंबर म्हणजे नात्यातील विश्वास, आणि भरोशाचे प्रतिक. तेव्हा आपणही नवीन वर्षाकडे म्हणजे या वर्षात जगात घडणाऱ्या सर्व घटनांकडे निकोप दृष्टीने म्हणजे सारासार विचार करून पाहू असा संकल्प करायला हरकत नाही.

Leave a Comment