विमानावर अवतरले थलाईवा रजनीकांत


दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत याची गोष्टच वेगळी. त्याचे चाहते किती संखेने आहेत आणि त्याची लोकप्रियता किती या आता मोजण्याच्या पलीकडे गेलेल्या गोष्टी आहेत कारण त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी किती प्रेम आहे हे अनेक कारणांनी वेळोवेळी दिसून येत आहे. यासाठीच रजनीकांतला थलाईवा असे नाव त्याच्या चाहत्यांनी दिले आहे ज्याचा अर्थ आहे नेता. त्याने बोलायचे आणि रसिकांनी डोलायचे अशी परिस्थिती आहे.

रजनीप्रेमाचा अजून एक नमुना नुकताच समोर आला आहे. एअर एशिया इंडियाने त्यांचे एक विमान रजनीकांत याच्या एका चित्रपटासाठी समर्पित केले आहे. रजनीकांत याचा दरबार चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे पोस्टर या विमानावर प्रिंट केले गेले आहे. अर्थात त्यामुळे रजनीकांतचे चाहते खुश झाले आहेत. ९ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होत असून तो हिंदी, तमिळ, मल्याळी, आणि तेलगु भाषेत बनविला गेला आहे. यात रजनीकांत सोबत सुनील शेट्टी, नयनतारा, प्रतिक बब्बर, निवेथा थॉमस आणि योगी बाबू यांच्या भूमिका आहेत.

Leave a Comment