लडाखचे एनर्जी ड्रिंक गुर गुर चहा


लडाख आजकाल पर्यटकांचे आवडते पर्यटन केंद्र बनले आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत आहेत. त्यामुळे लडाखी लोकांचे जीवन, त्यांचे खाणेपिणे त्यांच्या परंपरा आता बाहेरच्या जगाला समजू लागल्या आहेत. त्यातील एक आहे तेथील ५०० वर्षाची परंपरा असलेला गुर गुर चहा. लडाख मध्ये हा चहा एनर्जी ड्रिंक म्हणून प्यायला जातो आणि शेतकरी शेतावर जाताना या चहाची किटली सोबत घेऊन जातात.

कसा बनतो हा चहा? तर हा चहा बनविण्याची पद्धत वेगळी आहे. प्रथम भांड्यात पाणी घेऊन त्यात ही विशेष चहा पत्ती उकळविली जाते. जेवढा चहा उकळाल तेवढा त्याचा रंग अधिक येतो. मग त्यात मीठ, लोणी आणि दुध घातले जाते. पण त्याअगोदर उकळलेला चहा एका विशिष्ट भांड्यात घुसळला जातो. हे भांडे लाकूड आणि पितळ यापासून बनविलेले असते आणि त्याचा आकार लाटण्यासारखा असतो. या भांड्याला गुर गुर असे नाव आहे. या भांड्यात चहा घुसळला की तो परत एकदा पितळी किटलीत घालून उकळला जातो. या किटलीला तागु म्हणतात.

हा चहा १३० ते १५० रुपये किलोनी मिळतो आणि तो कारगील, भूतान आणि काश्मीर मध्येच पिकतो.

Leave a Comment