टोक्यो ऑलिम्पिक भारताचे १०० वे ऑलिम्पिक


यंदा जुलै ऑगस्ट मध्ये जपानच्या टोक्यो मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत असून भारताचे सहभागाचे हे १०० वे ऑलिम्पिक आहे. ऑलिम्पिकची सुरवात ग्रीस मध्ये १८९६ साली झाली पण भारताचा या स्पर्धेतला अधिकृत सहभाग १९२० मध्ये झाला. म्हणजे यंदाचे ऑलिम्पिक भारताचे शतकी ऑलिम्पिक आहे.

इतिहास सांगतो, १९०० मध्ये जेव्हा भारतावर ब्रिटीश शासन होते तेव्हा पॅरीस मध्ये झालेल्या या स्पर्धेत नॉर्मन पिचार्ड याने पुरुष २०० मीटर धावस्पर्धेत आणि २०० मीटर अडथळे स्पर्धेत भारतातून जाऊन २ रजत पदके मिळविली होती. पण पिचार्ड ब्रिटीश असल्याने ही पदके भारताची मानली गेली नाहीत. १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती स्थापन झाली. तेव्हा त्यांनी पिचार्डने मिळविलेली पदके भारताच्या खात्यात जमा केली. १९०० ते २०१६ या काळात भारताने एकूण २८ पदके मिळविली असून त्यातील ९ सुवर्ण पदके आहेत. त्यात ८ सुवर्ण पदके हॉकीची आहेत. एकूण २८ पदकात ९ सुवर्ण, ५ रजत आणि १२ कांस्य पदके आहेत. अभिनव ब्रिंदाने निशाणेबाजी मध्ये एकमेव सुवर्ण पदक मिळविले आहे.

भारताची पदकांची यादी पहिली तर हॉकीमध्ये ११, निशाणेबाजी मध्ये ४, कुस्ती मध्ये ५, बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध मध्ये प्रत्येकी दोन, टेनिस, वेटलिफ्टिंग प्रत्येकी एक अशी पदके आहेत. १९२० साली भारताने ६ खेळाडूंचे पथक ऑलिम्पिक साठी पाठविले होते आणि २०१६ साली भारताचे ११८ खेळाडूंचे पथक ऑलिम्पिक साठी गेले होते. १९५२ च्या ऑलिम्पिक मध्ये भारताचे खाशाबा जाधव यांनी कुस्ती मध्ये देशासाठी कांस्य पदकाची कमाई केली होती. १९८० मध्ये भारताने हॉकीचे सुवर्ण पदक शेवटचे जिंकले होते.

Leave a Comment