गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे – सोने भावाची उसळी


अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीत गुंतवणूकदरांनी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी जगभरच्या बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत. भारतात शुक्रवारी सोन्याने आत्तापर्यंतच्या भावाचे रेकॉर्ड मोडले असून प्रथमच सोन्याचे दर दहा ग्रॅमला ४१०७० रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या भावानेही उसळी घेतली असून हे भाव १००० रुपयांनी वाढून किलोला ४८६५० वर गेले आहेत.

अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे राजनैतिक तणाव वाढला असून तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कच्या तेलाचे दर वाढले आहेत. परिणामी त्यामुळे डॉलर वधारला आहे आणि मौल्यवान धातूचे दरही वाढले. बाजार विश्लेषकांच्या मते परिस्थिती अशीच राहिली तर सोने दर जागतिक बाजारात औसाला १५७५ डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. भारतात ग्राहकांकडून मागणी कमी असूनही सोन्याचे दर ७२० रुपयांनी वाढले असून ८ ग्रामचे नाणे ३०,८०० रुपयांवर गेले आहे.

Leave a Comment