अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर स्ट्राईकद्वारे इराणच्या कुद्स दलाचे प्रमुख कासिम सुलेमानीला ठार केले. सुलेमानीला ठार केल्यानंतर इराण-अमेरिकेतील वाद आता अधिकच चिघळला आहे. इराणने या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे. हे कासिम सुलेमानी कोण होते, त्याविषयी जाणून घेऊया.
सुलेमानी इराणच्या रिवॉल्युशनरी गार्ड्सची परदेशी शाखा कुद्स दलाचे प्रमुख होते. सीरिया आणि इराकच्या लढाईमध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती.

एकीकडे इराणचे क्षेत्रीय शत्रू सौदी अरेबिया आणि इस्त्रायल मध्य-पुर्वेमध्ये पुढे जाण्यापासून इराणला थांबण्यासाठी संपुर्ण शक्ती लावत आहेत, तर दुसरीकडे अमेरिका देखील इराणच्या विरोधात कारवाई करत आहे. या सर्वात मध्य-पुर्व क्षेत्रात इराणचा प्रभाव वाढवण्यासाठी मेजर जनरल सुलेमानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मागील 20 वर्षात अमेरिका, इस्त्रायल आणि अरब एजेंसींनी सुलेमानी यांना मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही. सुलेमानींच्या सैन्याला इराणच्या सीमेबाहेरील ऑपरेशन्सची जबाबदारी होती. 2011 मध्ये सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद गृहयुद्ध हरणार असे वाटत असतानाच सुलेमानी यांच्या दलाने त्यांना मदत केली.

सुलेमानी 1998 मध्ये इराणी रिवॉल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख झाले होते. सुलेमानी लेबनानमध्ये हेजोबुल्लाह, सीरियात असद आणि इराणमध्ये शिया समर्पित मिलिशिया समुहांसोबत जवळीकता वाढवण्यास यश मिळवले होते. सुलेमानी यांच्यामुळे इराणच्या मुख्य लष्करापेक्षा अधिक ताकदवर इराणचे रिवॉल्युशनरी गार्ड्स झाले होते.
सुलेमानींचा जन्म पुर्व इराणमधील एका गरीब कुटूंबात झाला होता. कुटूंबाचे पालनपोषण करण्यासाठी ते 13 वर्षांचे असल्यापासून काम करत होते. 1979 मध्ये इराण क्रांतीच्या काळात त्याने 6 आठवडे ट्रेनिंग घेतली व इराणच्या अजरबॅजान प्रांतात लढाई लढली. इराण-इराकच्या युद्धानंतर ते राष्ट्रीय हिरो म्हणून समोर आले.

2005 मध्ये इराकमध्ये नवीन सरकार आल्यानंतर सुलेमानीची इराकच्या राजकारणात दखल अधिक वाढला. 2011 मध्ये अमिरेका सीरियामधील असद सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना सुलेमानी यांनी इराकी प्रॉक्सी फोर्सला असद सरकारच्या मदतीला पाठवले.
सुलेमानींना इराणमधील दुसरी सर्वात शक्तीशाली व्यक्ती समजले जात असे. 2019 मध्ये त्यांचा सैन्याचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. 1979 नंतर पहिल्यांदाच एखाद्या कमांडरला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अमेकिकेने 2019 मध्ये इराणच्या या रिवॉल्युशनरी गार्ड्सला परदेशी आंतकवादी संघटना म्हणून घोषित केले होते. या गार्ड्सने सीरियामध्ये अनेक एअर स्ट्राईक देखील केले आहेत.