श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी विराटने बदलला आपला लुक


नवी दिल्ली – 5 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला सुरूवात होणार असून या मालिकेत नव्या लुकमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली पाहायला मिळेल. विराटने स्वित्झरलँडहून परतल्यानंतर नामवंत हेयर स्टायलिस्ट आलिम हाकिम यांच्याकडे हेअरकट केला आहे.


इन्स्टाग्रामवर विराटच्या नव्या लुकचे फोटो व्हायरल झाले आहेत. विराटसह आलिम हाकिमही या फोटोत दिसून येत आहेत. दरम्यान, हाकिम हे नामवंत हेअर स्टायलिस्ट असून ते हार्दिक पांड्या, युवराज सिंग, युझवेंद्र चहल यांच्यासह अनेक नामवंत खेळाडूंचे हेअरकट करतात.

विराट कोहलीला हाकिम यांनी केलेला हेअरकट शोभून दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ५ जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

Leave a Comment