उबर महिला चालकाने अनोळखी पँसेंजरच्या मदतीमुळे पुर्ण केले शिक्षण

अनेकदा लग्न झाल्यावर महिलांचे शिक्षण अपुर्णच राहते. इच्छा असून देखील घरातील जबाबदाऱ्यांमुळे पुढील शिक्षण पुर्ण करता येत नाही. असेच काहीसे एका महिला उबर ड्रायव्हरबरोबर झाले. लग्न झाले, मुले झाली. पतीबरोबर घटस्फोट देखील झाला. या सर्वांमध्ये शिक्षण मागेच पडले. मात्र एकेदिवशी एक पँसेंजर देवमाणूस बनून त्या महिलेसाठी आला. या पँसेंजरने महिलेला शिकण्यासाठी पैसे दिले आणि त्या महिलेने देखील पदवी घेऊन दाखवली.

Image Credited – wsvn

अमेरिकेच्या अटलांटा येथील लटोंन्या यंग या हेअर स्टाइलिस्ट आहेत. रात्री त्या टॅक्सी चालवतात. एकदा केव्हिन नावाच्या व्यक्तीने टॅक्सी बुक केली होती. दोघेही बोलत असताना महिलेने केव्हिन यांना आपल्याबद्दल सांगितले. पैशांमुळे शिक्षण देखील पुर्ण करता येत नसल्याचे सांगितले.

Image Credited – Global News

यंगने सांगितले की, तिची फी 700 डॉलर ( जवळपास 50 हजार रुपये) आहे. केव्हिनने यंगला ही फी भरण्यासाठी मदत केली. यंग सांगते की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने त्यांची एवढी मदत केलेली नाही. डिसेंबरमध्ये यंगने क्रिमिनल जस्टीसमध्ये पदवी घेतली.

केव्हिनने सांगितले की, मी नवीन कपडे घेण्याऐवजी कोणाची तरी मदत करणे गरजेचे असल्याचे मानतो. मला यंगवर गर्व आहे. आम्ही दोघेही आता चांगले मित्र आहोत.

Leave a Comment