आज जळगावात फडणवीस, महाजन घेणार एकनाथ खडसेंची भेट


जळगाव – आज (शुक्रवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांची जळगावात भेट घेणार आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज जळगावात देवेंद्र फडणवीस असून धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते खान्देश दौऱ्यावर आहेत. ते आज भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांची भेट घेणार असल्याचे समजते. फडणवीस, खडसे आणि गिरीश महाजन अशी तिघांची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान काल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद नाहीत. मागच्याच आठवड्यात खडसे आणि मी मुंबईत एकाच ताटात जेवलो. मात्र, माध्यमांनीच या विषयाचा विपर्यास केला, असल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

Leave a Comment