एसबीआयमध्ये या पदासाठी 7870 जागांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) क्लार्क पदांच्या भरतीसाठी अधिकृत नॉटिफिकेशन जारी केले आहे. हे नॉटिफिकेशन बँकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन तुम्ही पाहू शकता.

या भरती प्रक्रियेद्वारे एसबीआय ज्यूनिअर असोसिएटची (क्लार्क) एकूण 7870 पदे भरली जातील. या पदांसाठी 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करता येईल. या पदांसाठी पुर्व परिक्षा फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये होण्याची शक्यता आहे. तर मुख्य परिक्षा 19 एप्रिल 2020 ला होईल.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2020 ला कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सुट मिळेल.

निवड ही पुर्व परिक्षा आणि मुख्य परिक्षेच्या आधारावर होईल. पुर्व परिक्षेत 100 प्रश्न असतील व यासाठी 1 तास वेळ दिली जाईल. तर मुख्य परिक्षेत 200 गुणांसाठी 190 प्रश्न विचारले जातील. यासाठी 2 तास 40 मिनिटे वेळ दिला जाईल.

Leave a Comment