जाणून घ्या भारत-नेपाळमधील ‘कालापाणी’ वादाबद्दल

भारताने जारी केलेल्या नकाशावर नेपाळने आक्षेप घेतला होता. सरकारने आपल्या नकाशात भारत-नेपाळ सीमेलगतच्या कालापाणी हे क्षेत्र भारतात दाखवले आहे. या क्षेत्राविषयी नेपाळने आक्षेप घेतला आहे. याविषयी केंद्र सरकारने सांगितले की, जम्मू-काश्मिरच्या पुर्नगठननंतर जारी करण्यात आलेल्या नकाशांमध्ये सीमांचे चित्रण योग्यरित्या करण्यात आलेले आहे.

या मुद्यावरून दोन देशातील परराष्ट्र सचिवांमध्ये 15 जानेवारील चर्चा होण्याची शक्यता आहे.

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांच्या आत दोन वास्तविक नकाशे सादर करण्यास सांगितले आहे. ज्याचे आदान-प्रदान 1816 मध्ये सुगौली करारावेळी आणि 1960 मध्ये सीमासंधीवर सही करताना करण्यात आले होते. नेपाळचा भूभाग सुरक्षा निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेची सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने नेपाळ सरकारकडे 1816 चा नकाशा मागितला होता. ईस्ट इंडिया कंपनीने 1 फेब्रुवारी 1827 ला नकाशा प्रकाशित केला होता. नंतर ब्रिटिश सरकारने 1847 ला वेगळा नकाशा प्रकाशित केला.

कोठे आहे कालापाणी ?

कालापाणी चीन, नेपाळ आणि भारतीय सीमा जेथे एकमेंकाना भेटतात तेथील 372 वर्ग किमीचे क्षेत्र आहे. भारत याला उत्तराखंडचा भाग मानते तर नेपाळ हा भाग आपला असल्याचा दावा करत आहे.

सुगौली करार काय आहे ?

नेपाळ आणि ब्रिटिश इंडियामध्ये सुगौली करार 1816 मध्ये झाला होता. यामध्ये कालापाणी क्षेत्रातून वाहणारी महाकाली नदीला भारत-नेपाळ सीमा मानले गेले. मात्र सर्वक्षण करणाऱ्या ब्रिटिश आधिकाऱ्याने नंतर नदीचे उगम स्थान देखील चिन्हित केले. ज्यातील अनेक ठिकाणी सहाय्यक नद्या देखील मिळतात. नेपाळचा दावा आहे की, पश्चिम क्षेत्रातून वाहणारी जलधाराच वास्तविक नदी आहे. तर भारत नदीचे उगम स्थळ दुसरे सांगत या ठिकाणी आपला दावा करत आहे.

कालापाणी का महत्त्वाचे ?

कालापाणी भागातील लिपलेख दरी चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वपुर्ण आहे. 1962 पासूनच कालापाणीवर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलील तैनात आहेत.

 

Leave a Comment