या देशाने आपल्या सैनिकांना दिले चक्क ‘पोकेमॉन गो’ खेळण्याचे आदेश

कॅनडाच्या सैन्याने आपल्या अधिकाऱ्यांना देशभरातील सैन्य बेस कॅम्प, संवेदनशील भागात जाऊन पोकेमॉन गो गेम खेळण्याचे आदेश दिले आहेत. हा खुलासा काही दिवसांपुर्वीच सैन्याच्या कागदपत्रांद्वारे झाला आहे.

हा निर्णय यासाठी घेण्यात आला आहे, कारण हा गेम खेळत असतानाच सर्वसामान्य लोकांनी (गेमर्स) कॅनडाच्या सैन्य ठिकाण आणि प्रतिबंधित स्थानांवर घुसखोरी केली आहे. यामुळे या भागात धोका निर्माण झाला आहे. किंग्सटन येथील सैन्य कॅम्पाचे अधिकारी जेफ मोनाघन यांनी ईमेलमध्ये कमिश्नरला लिहिले की, फोर्ट फ्रोनेटॅनेक सारख्या संवेदनशील भागात पोकेजिम आणि पोकेस्टॉप बनले आहेत, ते काय आहे ? सैन्याने या प्रकारची काल्पनिक पात्र आणि स्थानांची ओळख करण्यासाठी 3 अधिकाऱ्यांना देशभरातील सैन्य ठिकाणांवर जाऊन गेम खेळण्याची जबाबदारी दिली आहे.

या अधिकाऱ्यांबरोबर एक 12 वर्षांचा मुलगा देखील आहे. जेणेकरून पात्र आणि स्थानांची ओळख पटू शकेल.

सैन्यासाठी ही चिंतेची गोष्ट आहे. कारण ही गेम खेळताना कॅमेरा आणि जीपीएसचा वापर होतो. स्मार्टफोनद्वारे हा गेम खेळला जातो. त्यामुळे संवेदनशील भागातील फोटो आणि लोकेशन सहज शेअर केले जाते. काही दिवसांपुर्वीच एक महिला आणि तीन मुलांना पोकेमॉन गो खेळत असाताना सैन्य अड्ड्यावर कारमध्ये फिरत असताना पकडण्यात आले होते.

Leave a Comment