बिल गेट्स यांच्यासाठी हे काम करा आणि मिळवा 35 लाख - Majha Paper

बिल गेट्स यांच्यासाठी हे काम करा आणि मिळवा 35 लाख

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे तुम्हाला 35 लाख रुपये देऊ शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला त्यांचे एक काम करावे लागेल. यासाठी तुम्हाला एक डिजिटल पेमेंट सिस्टम तयार करावी लागेल.

भारतात स्मार्टफोनचा बाजार वेगाने वाढत आहे. मात्र आजही भारत अनेकजण फीचर फोनचा वापर करतात. भारतात आजही 50 कोटींपेक्षा अधिक लोक फीचर फोनचा वापर करतात. स्मार्टफोनद्वारे तर डिजिटल पेमेंट करणे शक्य आहे. मात्र फीचर फोन असणाऱ्यांसाठी ही सुविधा नाही. त्यामुळे तुम्हाला फीचर फोनसाठी एक पेमेंट सिस्टम तयार करावी लागेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार, फीचर फोनद्वारे खूप कमी डिजिटल पेमेंट होते.

त्यामुळे एनपीसीआयने CIIE.CO, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत एक भागिदारी केली आहे. यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याला ‘Grand Challenge Payments Using Feature Phones’ असे नाव देण्यात आले आहे. ही स्पर्धा फिचर फोनसाठी डिजिटल पेमेंट सिस्टम तयार करण्याची आहे. ही सिस्टम तयार करणाऱ्याला 35 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल.

या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2020 आहे.  14 मार्च 2014 ला विजेत्याची घोषणा केली जाईल. या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस 50 हजार डॉलर (जवळपास 35 लाख रुपये) आहे. तर दुसरे बक्षीस 21,50,565 रुपये आणि तिसरे 14,33,710 रुपये आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची निवड पेमेंट सिक्युरिटी आणि इतर गोष्टींच्या आधारावर केली जाईल. अर्ज करण्यासाठी  https://grand-challenge.ciie.co/ या लिंकवर जाऊ शकता.

Leave a Comment