नेपाळ्यांसारखा दिसता असे सांगत 2 बहिणींना नाकारला पासपोर्ट

नेपाळ्यांसारखे दिसत असल्याने हरियाणा येथील 2 बहिणांना पासपोर्ट देण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आता हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

हरियाणा येथील संतोष आण हिना नावाच्या दोन बहिणींनी चंदिगड येथील पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मात्र त्यांना पासपोर्ट नाकारण्यात आला व त्यांच्या कागदपत्रांवर ‘अर्जदार नेपाळी दिसत आहेत’, असे लिहिण्यात आले.

या घटनेनंतर त्यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रक्रिया सुरू झाली असून, दोन्ही बहिणींना लवकर पासपोर्ट मिळेल.

एका बहिणीने या प्रकरणावर सांगितले की, जेव्हा आम्ही चंदीगढच्या पासपोर्ट कार्यालयात गेलो तेव्हा त्यांनी आमचे चेहरे पाहिले आणि आम्ही नेपाळी असल्याचे लिहिले. त्यांनी आम्हाला राष्ट्रीयता सिद्ध करण्यास सांगितले. आम्ही गृहमंत्री अनिल विज यांना याबाबत माहिती दिल्यावर पासपोर्ट बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Leave a Comment