चीनच्या हेलोंगयांगा प्रांतातील हार्बिन येथील जगातील सर्वात मोठा आइस अँन्ड स्नो फेस्टिवल रविवारपासून सुरू होणार आहे. हा फेस्टिवल जवळपास 2 महिने सुरू राहिल. यंदा येथे 14 देशांच्या कलाकारांनी बर्फाच्या 200 पेक्षा अधिक कलाकृती तयार केल्या आहेत.
6 लाख स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या स्नो वर्ल्डमध्ये 2.20 लाख क्यूबिक मीटर बर्फाद्वारे 100 मीटर उंच शिल्पकला तयार करण्यात आलेल्या आहेत. पर्यटकांसाठी कलाकृतींचे प्रदर्शन सुरू झाले आहे.

चीनसह जगभरातील 14 देशांमधील हजारो कलाकारांनी 10-20 डिग्री सेल्सियसमध्ये या कलाकृती तयार केल्या आहेत. हिवाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक आइस सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्बन शहराला भेट देतात. हा फेस्टिवल सर्वात प्रथम 1985 मध्ये साजरा करण्यात आला होता.