500 फूट उंचावरून पडून देखील 16 वर्षीय गिर्यारोहकचे वाचले प्राण

मूळ भारतीय वंशाचा कॅनेडियन 16 वर्षीय गिर्यारोहक गुरबाज सिंह अमेरिकेच्या ओरेगोन येथील 11240 फूट उंच माउंट हूड येथून पडल्यानंतरही आश्चर्यकारकरित्या वाचला आहे. आपल्या मित्रांबरोबर पर्वतावर चढाई करत असताना, अचानक पाय घसरल्याने तो 500 फूट खाली कोसळला. बचाव दलाला त्याच्यापर्यंत पोहचण्याठी 4 तास लागले व तेवढाच वेळ त्याला बेस कॅम्पपर्यंत आणण्यासाठी लागला.

गुरबाजने सांगितले की, तो वरती चढत असताना अचानक त्याचा पाय घसरला. पडताना असे वाटले की, आता वाचणार नाही. या घटनेत त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. तो 10500 फूट इंचीवर अडकला होता.

डॉक्टरांनी सांगितले की, गुरबाजने हेल्मेट घातले असल्याने त्याला कमी दुखापत झाली. याशिवाय त्याला देण्यात आलेले प्रशिक्षण देखील कामी आले. त्याच्या वडिलांनी सांगितले की, आता गुरबाज पुर्णपणे ठीक असून, दुखापतीतून बरा झाल्यानंतर तो पुन्हा माउंड हूडवर चढाई करेल व आपले लक्ष्य पुर्ण करेल.

Leave a Comment