यावर्षी लक्षात ठेवा या तारखा, आर्थिक कामे होतील सोपी

जेव्हा गोष्ट पैशांची असते, तेव्हा पुर्वीपासूनच तयारी करून ठेवणे गरजेचे असते. अनेकदा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख, पैसे भरण्याची मुदत निघून गेल्यानंतर आपल्या लक्षात येते. त्यामुळे महत्त्वाच्या तारखांची नोंद करून ठेवणे गरजेचेच असते. 2020 मधील अशाच काही आर्थिक बाबींच्या महत्त्वाच्या तारखेबद्दल जाणून घेऊया.

पंतप्रधान आवास योजाना –

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणारी गृहकर्ज सबसीडीची अंतिम तारीख 31 मार्च 2020 आहे. मध्यम उत्पन्न गटात येणारे याचा फायदा घेऊ शकतात.

पंतप्रधान व्यय वंदन योजना –

वरिष्ठ नागरिकांसाठी पेंशन योजना – पंतप्रधान व्यय वंदन योजनेमध्ये 10 वर्षांसाठी गँरेंटी पेंशन मिळते. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.

पॅन-आधारकार्ड लिंक –

पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ही वाढवून 31 मार्च 2020 करण्यात आलेली आहे. पॅन-आधार लिंक न केल्यास पॅन वापरता येणार नाही.

फास्टॅग – 

सर्व वाहनांमध्ये फास्टॅग लावण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी आहे. फास्टॅग न लावल्यास दुप्पट टोल भरावा लागेल.

आयटीआर फाइलिंग – 

जर तुम्ही आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयटीआर फाइल केले नसेल तर कोणत्याही परिस्थितीत ते 31 मार्चपर्यंत फाइल करा. ही तारीख निघून गेल्यास तुम्ही आयटीआर फाइल करू शकणार नाहीत. लेट फायलिंगसाठी तुम्हाला 10 हजार रुपये लेट फीसह आयटीआर भरावा लागेल. रिवाइज्ड रिटर्नची अंतिम तारीख देखील 31 मार्च 2020 आहे.

टीडीएस – 

जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल व तुमचे भाडे 50 हजारांपेक्षा अधिक असेल तर आयकर कायद्यानुसार तुम्हाला टीडीएस द्यावा लागेल. आर्थिक वर्षादरम्यान एकूण भाड्यावर 5 टक्के टॅक्स डिडक्शन होतो. हे डिडक्शन घर खाली करताना अथवा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी केले जाते. अंतिम तारखेच्या 30 दिवस आधी टीडीएस जमा करावा अन्यथा पेनेल्टी लागेल.

कर बचतीसाठी गुंतवणूक –

जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर 31 मार्चपुर्वी कर बचत गुंतवणुकीचे काम पुर्ण करा. जर या तारखेपुर्वी तुम्ही गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला करात सुट मिळणार नाही.

टीडीएस वाचवण्यासाठी कागदपत्रे –

जास्त टीडीएस कापला जाऊ नये, त्यामुळे योग्य वेळी गुंतवणूक कागदपत्रे एंप्लॉयरकडे जमा करणे गरजेचे आहे. कर वाचवण्यासाठी गुंतवणुकी संबंधित कागदपत्रे, रेंट अग्रीमेंट जमा करावे लागतात. प्रत्येक कंपनीची तारीख वेगळी असते.

टीडीएस सर्टिफिकेट – 

आयटीआर फाइल करण्यासाठी तुमच्याकडे नवीन टीडीएस सर्टिफिकेट हवे. याशिवाय बँकेचे सर्टिफिकेट देखील गरजेचे आहे. कंपनीकडून 16 नंबरचा फॉर्म मिळतो. ज्यामुळे टीडीएसची माहिती असते. तसेच व्याजाची रक्कम 10 हजारांपेक्षा अधिक असल्यास बँक 16 (ए) फॉर्म देतात. बँक आणि कंपनी 15 जूननंतर टीडीएस सर्टिफिकेट जारी करतात.

एचयूएफ अकाउंटसाठी आयटीआर फाइलिंग – 

आयटीआर फाइल करण्यासाठी एचयूएफसाठी अंतिम तारीख 31 जुलै आहे. या तारखेनंतर आयटीआर फाईल केल्यास पेनेल्टी भरावी लागेल.

Leave a Comment