यंदा नवजात बाळांसाठी ही नावे ट्रेंडमध्ये


नवीन वर्षाची सुरवात नुकतीच झाली आहे. या वर्षात ज्यांच्या घरी पाळणा हलणार आहे, तेथे बाळाचे नाव काय ठेवायचे याची चर्चा अगोदरच सुरु झाली आहे. केवळ कुटुंबीयच नाही तर अन्य नातेवाईक मंडळीही अनेक नवनवी नावे या नवजात बालकांसाठी सुचवीत आहेत. बाळाचे नाव ठेवताना ते थोडे हटके हवे, उच्चारायला सोपे हवे आणि छान हवे असे सगळ्यांनाच वाटते. २०२० मध्ये ज्या नावांना अधिक पसंती दिली जात आहे त्याची एक यादी एका संस्थेने प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार २०२० मध्येही आरव, अर्णव, अरहान आणि अरमान या मुलांच्या नावांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. पण त्याचबरोबर आकर्ष, बादल, भवित, चिराग, दर्शित, देवांश, दिवीत, आझाद, इवान, विहान, यक्षित ही नावेही ट्रेंड मध्ये आहेत.

मुलींचा विचार केला तर जान्हवी, कनक, खुशी आणि परी ही नावे टॉप वर आहेत. पण त्याचबरोबर आरना, आदिरा, अहाना, अलिशा, अमानी, चार्वी, दिया, इला, इवा, जिया, कियारा, कश्वी, मन्नत, महिका ही नावेही पसंत केली जात असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment