दिल्लीच्या लाजपतनगर मध्ये बसला पहिला स्मॉग कंट्रोल टॉवर


प्रदूषणाने हैराण झालेल्या दिल्लीकरांना लजपतनगर भागात शुध्द हवा मिळण्याची सोय झाली असून त्या भागात दिल्लीतील पहिला स्मॉग टॉवर कार्यान्वित करण्यात आला आहे. शुध्द नावाचा हा टॉवर ७५० मीटर परिसरातील हवा शुध्द करू शकणार आहे. या फ्रेंचमेड शुध्द नावाच्या एअर प्युरीफायर साठी ट्रेडर्स असोसिएशन लजपतनगर आणि खासदार गौतम गंभीर यांच्या गौतम गंभीर फौंडेशनने आर्थिक सहाय्य केले आहे. या टॉवर साठी दर महिना ३० हजार रुपये खर्च येणार असून रोज दीड ते सहा लाख क्युबिक मीटर हवा शुध्द केली जाणार आहे. या टॉवरची उंची २० फुट आहे.

दिल्ली किमान ५० जागी असे टॉवर उभारण्यची गरज आहे. पाऊस नाही आणि वारा नाही अश्या सध्याच्या हवामानात गुरुवारी दिल्ली एनसीआर मधील हवेने प्रदूषणाची अतिधोकादायक पातळी गाठली होती. देशातील ९९ शहरातील सात जागा अतिप्रदुषित म्हणून नोंदल्या गेल्या असून त्यात दिल्ली एनसीआर मधील तीन शहरे आहेत. सर्वधिक खराब हवा बिहारच्या मुझफ्फरनगर मधली आहे. त्यापाठोपाठ गुरगाव आणि दिल्ली एनसीआर यांचा नंबर आहे.

Leave a Comment