सर्वाधिक समलैंगिक कर्मचारी टाटा स्टीलमध्ये


टाटा स्टील लिमिटेड जगातील अशी एकमेव कंपनी ठरली आहे जेथे सर्वाधिक संख्येने समलैंगिक कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीतील ४७ लोकांनी ते समलैंगिक असल्याची माहिती कंपनीला दिली असून त्यांच्यासाठी कंपनीने मजबूत एचआर धोरण आखले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लैंगिक भेदभाव, असमानता दूर करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांकडून माहिती मागविली होती. ९ डिसेंबररोजी ह्युमन रिसोर्स पॉलिसीत त्यानुसार बदल केला गेला होता. समलैंगिक कर्मचाऱ्यांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे समान दर्जा देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. यामुळे कंपनीत काम करत असलेल्या पतीपत्नीना ज्या सुविधा दिल्या जातात त्या सर्व या जोडप्यांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या पार्टनरचे नाव रजिस्टर करावे लागणार आहे.

टाटा स्टीलचे व्हीपी सुरेशदत्त त्रिपाठी यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार एलजीबीटीक्यू समाजाप्रमाणे या कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळतील. आरोग्य सेवा, मेडिकल चेकअप, दत्तक रजा, बाळंतपणात पालकांना दिली जाणारी रजा, चाईल्ड केअर लिव्ह अश्या सुविधा त्यांना मिळतील. कंपनीत सध्या २५ ट्रांसजेंडर काम करत आहेत असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment