रियलमी ५ जीचे फोटो सीईओ कडून शेअर


कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी रियलमीच्या पहिल्यावाहिल्या ५ जी स्मार्टफोनचे फोटो त्यांच्या ट्विटर अकौंटवर पोस्ट केले आहेत. यात रियलमी मध्ये बॅक साईडला क्वाड कॅमेरा सेटअप दिसत आहे. या पहिल्या ५ जी फोनला स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर दिला जात असून हा फोन शाओमीच्या रेडमी के ३० या ५ जी फोनशी टक्कर घेईल. रेडमी के ३० काही दिवसांपूर्वी लाँच झाला आहे.

रियलमीच्या अन्य फिचरमध्ये वाईड अँगल कॅमेरा दिला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. रियलमी चे प्रोडक्ट डायरेक्टर वांग वेई डेरेक यांनी जारी केलेल्या टीझरमध्ये फोन उजव्या बाजूने दाखविला गेला असून तेथे साईडला फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत आहे. फोनला एलसीडी डिस्प्ले पॅनल दिले जात आहे, त्यामुळे डिस्प्लेची किमंत कमी होणार असून हा फोन बजेट किमतीत सादर करणे शक्य होणार आहे. हा फोन दोन दिवसांच्या बॅटरी बॅकअप असेल असेही समजते.

Leave a Comment