इस्रोची ही प्रणाली मिळणार शाओमीच्या फोनमध्ये

स्मार्टफोन युजर्सला लवकरच स्वदेशी जीपीएस प्रणाली नाविकचा वापर करता येणार आहे. यासंबंधी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीमध्ये बोलणे सुरू आहे. या प्रोजेक्टला मंजूरी दिल्यानंतर शाओमी क्वॉलकॉमद्वारे तयार केलेले चिपसेटसह नाविक जीपीएस स्मार्टफोनमध्ये मिळेल.

इस्त्रोच्या आधिकाऱ्यांनी सांगितले की, क्वॉलकॉमने आधीच स्पष्ट केले आहे की त्यांच्या चिपमध्ये नाविकचा समावेश असेल. त्यानंतर आता शाओमी देखील यासाठी तयार झाले आहे. या संदर्भात बोलणी अंतिम टप्प्यात असून, शाओमी आपले स्मार्टफोन नाविक चिपसेटसह लाँच करण्याची शक्यता आहे.

इस्त्रोने ऑक्टोंबर 2019 मध्ये सांगितले होते की, क्वॉलकॉम नाविक सपोर्ट करणारे प्रोसेसर तयार केले असून, त्याची यशस्वीरित्या चाचणी पुर्ण झाली आहे.

नाविक हे जीपीएसचे भारतीय व्हर्जन आहे. ते भारत आणि त्याच्या सीमा भागातील 1500 किमीपर्यंत अंतरातील लोकेशन डेटा, भौगोलिक माहिती देईल. नाविक सुरू झाल्यावर हे दोन प्रकारची सेवा पुरवेल. एकामध्ये आता आपण वापरत असलेल्या लोकेशन सर्विसप्रमाणे स्टँडर्ड पोझिशनिंग सर्विस सर्व युजर्सला देईल व दुसरी रेस्ट्रिक्टेड सर्विस ही फक्त अधिकृत युजर्सलाच असेल.

2020 मध्ये चीन देखील आपली नेव्हिगेशन सिस्टम बेईडोऊ (Beidou) सुरू करणार आहे. तसेच यूरोपियन यूनियन आणि रशियाकडे देखील स्वतःची नेव्हिगेशन सिस्टम आहे.

 

Leave a Comment