खुशखबर ! आता 160 रुपयांमध्ये पाहता येणार सर्व ‘फ्री टू एअर’ चॅनेल्स

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने केबल आणि ब्रॉडकास्टिंगसाठी नवीन दरांची नियमावली जारी केली आहे. आता केबल टिव्ही ग्राहकांना कमी दरात अधिक चॅनेल्स पाहायला मिळणार आहेत.

सर्व फ्री टू एअर चॅनेलसाठी ट्रायने 160 रुपये दर ठरवले आहेत. हे नवीन दर 1 मार्चपासून लागू होतील. याशिवाय एकापेक्षा अधिक टिव्ही असणारे अथवा वेगवेगळ्या नावाने एक टिव्ही कनेक्शन असणाऱ्यांना दुसऱ्या कनेक्शनसाठी नेटवर्क कॅपिसिटी फी ही जास्तीत जास्त 40 टक्के घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ट्रायने एनसीएफ चार्जेसमध्ये देखील बदल केले आहेत. आता 130 रुपयांमध्ये 200 चॅनेल ग्राहकांना पाहण्यास मिळणार आहेत. यात कर वेगळा असेल. या पॅकेजमध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनिवार्य केलेल्या चॅनेल्सचा समावेश नसेल. याशिवाय 6 महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी असणारे स्बस्क्रिप्शन घेणाऱ्यांना डिस्ट्रिब्यूशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्सला सुट देण्यास परवानगी दिली आहे.

या व्यतरिक्त बुकेमध्ये केवळ 12 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या चॅनेल्सचाच समावेश असेल.

 

Leave a Comment