नकोशा झालेल्या प्राण्यांना आसरा देते ही व्यक्ती

रस्त्यावर अनेकदा आपण मांजर, भटकी कुत्री, गाई, गाढव अशा अनेक प्राण्यांना लोक त्रास देत असल्याचे, मारत असल्याचे पाहत असतो. मात्र अशा व्यक्तींपासून झालेल्या प्राण्यांसाठी नवी मुंबईच्या एका व्यक्तीने हात पुढे केला आहे.

नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर राहणाऱ्या मनूर सचदेवने अशा त्रास दिले गेलेल्या, जख्मी प्राण्यांसाठी ‘फीबीज ह्यूमन फ्रेंडली एनीमल फार्म’ सुरू केले आहे. मनूर हा एनीमल बिहेविअरिस्ट आहे, तो एक प्राणीमित्र आहे.

Image Credited – The Better India

मुंबईच्या बाहेरील भागात असलेले हे फार्म ऑर्गेनिक पद्धतीने चालवले जाते. हे फार्म एनजीओ अंतर्गत येत नाही, हे मनूरने स्वतः सुरू केले आहे. या ठिकाणी 200 पेक्षा अधिक प्रेमळ आणि सुंदर प्राणी आहेत.

या फार्ममध्ये पेडिग्रिड कुत्र्यांसोबतच देशी कुत्र्यांची संख्या देखील अधिक आहे. सोबतच मांजरी, बकरी, कासव, गाढव, गाई, बैल, मासे, बदक, कोंबडी, घोडे असे अनेक प्राणी आहेत. येथे असलेल्या प्रत्येक प्राण्याला मनुष्याच्या अत्याचारापासून वाचवून आणलेले आहे. येथे या प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते.

Image Credited – The Better India

मनूर यांनी आपले आवडते कुत्रे फिबीच्या आठवणीत हे फार्म सुरू केल आहे. मनूर सांगतात की, फिबी गेल्यानंतर मी खूप दुःखी होतो. फिबी आपल्या आजुबाजूच्या प्राण्यांवर प्रेम करत असे. त्यामुळे तिचे प्रेम मी या फार्मद्वारे गरजू प्राण्यांना देण्याचा विचार केला. हळहळू मी प्राण्यांना आसरा दिला व आज आमचे कुटूंब मोठे झाले आहे. हे प्राणी आजारी अवस्थेत येथे येतात आणि या सुंदर वातावरणात ठीक होतात.

 

मनूर सांगतात की, प्राण्यांना तरी ह्रदय असते, मात्र मनूष्य मानवता विसरत चालला आहे. आमच्या फार्ममधील बकरी आणि गाईंना कत्तलखान्यातून वाचवून आणण्यात आले आहे. तर कुत्रे आणि मांजरींना माणसांपासून वाचवून आणले आहे. आता तर मनुष्याला मनुष्य म्हटले जाऊ शकत नाही.

येथे सुट्ट्यांमध्ये येणाऱ्या लोकांमुळे फार्मचा खर्च भागतो. मनूर सांगतात की, आजही काही प्राणीप्रेमी लोक आहेत जे या प्राण्यांना दत्तक घेऊ इच्छितात. मात्र यासाठी मी स्वतः घरी जाऊन तपासणी करतो आणि सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरच दत्तक देतो. हे प्राणी एकदा द्वेषातून गेले आहेत, त्यामुळे पुन्हा त्यांना त्रास होऊ नये एवढेच मला हवे आहे.

Leave a Comment