महाराष्ट्रात सुरू होणार साथीच्या आजाराची माहिती आधी देणारी अॅप आधारित प्रणाली

साथीच्या आजारांच्या लक्षणांची माहिती गोळा करण्यासाठी स्मार्टफोन अॅप्लिकेशन-आरोग्य माहिती प्रणाली महाराष्ट्रात सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या या प्रोजेक्टमध्ये पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील रुग्णांकडे लक्ष दिले जाईल.

यासाठी 10 हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, मेडिकल अधिकारी, फार्मासिस्टस आणि लॅब टेक्निशियन्स यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांना इलेक्ट्रिक मॉड्यूल वापरासाठी प्रशिक्षण दिले जाईल. याला इंटरग्रेटेड हेल्थ इंफॉर्मेशन प्लॅटफॉर्म (आयएचआयपी) म्हटले जाते. आयएचआयपी सुरू करणारे महाराष्ट्र 9वे राज्य आहे.

आयएचआयपीचे महाराष्ट्रातील प्रमुख प्रदीप आवटे यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्म अंतर्गत पेपर आणि सॉफ्टवेअरवरील आजारांचे डेटा कलेक्शन सिस्टमला मोबाईल आणि इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये बदलले जाईल. आजारांचा रिअल टाइम डेटावर याद्वारे मिळेल. तसेत जिओ-टॅगिंगही करण्यात येईल.

त्यांनी सांगितले की, याआधी वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी वेगवेगळे अॅप्स आणि सॉफ्टवेअर्स होते. मात्र आता आयएचआयपी अंतर्गत सर्व आरोग्य प्रोग्राम एकाच प्लॅटफॉर्म खाली येतील.

या मॉड्यूलच्या एकत्रीकरणामुळे अनेक अडचणी कमी होतील. ग्रामीण भागातील राज्य संचलित हॉस्पिटल्समध्ये डेटा एंट्री ऑपरेटर्स, मेडिकल अधिकारी आणि फार्मासिस्ट्स, यांच्या नोकऱ्यांचे आव्हान आहे.

आवटे यांनी सांगितले की,आमचे शॉर्ट टर्म लक्ष्य हे ग्रामीण भागातील रुग्णांची माहिती गोळा करणे हे आहे. त्यानंतर महानगरपालिका देखील या प्लॅटफॉर्म खाली येतील. प्रत्येक आरोग्य संस्थेतील डेटा या प्लॅटफॉर्म अंतर्गत रजिस्टर होईल. तसेच प्रत्येक व्यक्तीची माहिती नोंदवावी लागणार असल्याने यासाठी खूप वेळ जाईल.

Leave a Comment