व्हायरल; प्रशिक्षकाने 80 वर्षीय क्रिकेट चाहत्याला दिली खास भेट

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि एका वृद्ध क्रिकेट चाहत्याचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर लँगर यांनी या 80 वर्षीय क्रिकेट चाहत्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅप भेट दिली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, या 80 वर्षीय चाहत्याचे नाव बिल डीन आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स भागातील जंगलात लागलेल्या आगीने ते पीडित आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या व्हिडीओत सांगितले की, बिल डीन हे ऑस्ट्रेलियाचे अभ्यास सत्र पाहण्यासाठी येणार नव्हते. कारण धुरामुळे त्यांना त्रास होता. मात्र ते सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आले व त्यांनी लँगर यांच्यासोबत खास क्षण घालवला.

व्हिडीओमध्ये डीन लँगरचे आभार मानता म्हणत आहेत की, जस्टीन, खूप धन्यवाद, तू माझ्या आयुष्यातील अनेक वर्ष वाढवलीस.

लँगर यांनी यावेळी डीन यांना ट्रेनिंग कॅप देखील दिली. ऑस्ट्रेलियातील लहान मुलांच्या अथवा 80 वर्षीय बिल यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे ही असामान्य गोष्ट नाही. या कामाचा तो एक अधिकारच आहे. तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकता, अशा भावना लँगर यांनी बोलून दाखवल्या.

सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा कसोटी सामना पार पडणार आहे. या सामन्यादरम्यान पाऊस पडावा, कारण शहराला त्याची गरज आहे, असेही लँगर म्हणाले.

Leave a Comment