मोबाइलवर पॉर्न पाहण्यात भारतीयांनी अमेरिका-जपानलाही पछाडले


सध्या आपण डिजीटल युगात वावरत आहोत, त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसत आहेत. त्यातच या मोबाईलमध्ये आपल्या हवी असलेली सामग्री उपलब्ध असते. पण यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की ज्या वेगाने भारतात मोबाईलची विक्री सुरू आहे त्याच वेगाने मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मोबाइलवर पॉर्न पाहण्याच्या बाबतीत २०१९ या वर्षात आपला देश अव्वल स्थानी आहे.

यासंदर्भातील सर्वेक्षण अडल्ट इंटरनेटमेंट साईट पॉर्न हबने केले असून त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात २०१९ मध्ये सर्वाधिक पॉर्न पाहण्यात आले, याबाबतीत भारतानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. २०१९ मध्ये ८९ टक्के भारतीयांनी मोबाइलवर पॉर्न पाहिले आहे. २०१७ मध्ये ही आकडेवारी ८६ टक्के होती, म्हणजेच ही आकडेवारी २०१७ च्या तुलनेत ३ टक्के जास्त आहे.

मोबाइलवर पॉर्न पाहण्यात भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. त्याखालोखाल अनुक्रमे ब्राझिल, जपान आणि युकेचा क्रमांक लागतो. अमेरिकेत ८१ टक्के, ब्राझिलमध्ये ७९ टक्के, जपानमध्ये ७० टक्के तर युकेमध्ये ७४ टक्के लोकांनी मोबाइलवर पॉर्न पाहिले. त्याचबरोबर जगभरात चार लोकांपैकी तीनजण मोबाइलवर पॉर्न पाहत असल्याचेही पॉर्न हबच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही माहिती पॉर्नहबच्या इयर इन रिव्ह्यू रिपोर्टमध्ये उघड झाली आहे.

स्वस्त इंटरनेट. स्वस्त डेटा प्लान आणि महागड्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी झाल्याने भारतात पॉर्न पाहण्यात वाढ होण्याचे मागचे महत्वाचे कारण आहे. देशात स्वस्त मोबाइल इंटरनेट उपलब्ध असल्याने लोकांना मोबाइलवर इंटरनेट सर्फिंग करणे खूपच सोपे झाले आहे.

Leave a Comment