‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये असा असेल अजय देवगणचा लूक


बॉलीवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण तान्हाजीनंतर ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना आपल्या दिसणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार असून नुकताच या चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्टलूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अजय वायुसेनेच्या अधिका-याच्या अवतारात दिसला आहे. तो चित्रपटात स्कॉड्रन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारत आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धावर आधारित हा चित्रपट आहे.


‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये पोलिसांची भूमिका करणारा अजय एअरफोर्स ऑफिसरच्या रुपात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक दुधैया यांनी अजयचा हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटाविषयी बोलताना निर्माता भूषण कुमार यांनी सांगितले की, ही वीरगाथा नवीन पिढीपर्यंत नेणे फार महत्वाचे आहे. जेणेकरुन 1971 च्या भारत-पाक युद्धात विशेष भूमिका बजावणारे स्कॉड्रन लीडर विजय कर्णिक यांनी किती मोठा निर्णय घेतला हे त्यांना कळेल.

Leave a Comment