या ठिकाणी पिग्गीबँकमध्ये सापडली 1200 वर्ष जुनी सोन्याची नाणी

इस्त्रायलच्या पुरातत्वशास्त्रज्ञांना खोदकाम करत असताना 1200 वर्ष जुने गुल्लक (पिगी बँक) सापडले आहे. यात सोन्याची सात नाणी सापडली आहेत. इस्त्रायल एंटीक्विटीज अथॉरिटीने सांगितले की, ही नाणी प्रारंभिक इस्लामिक काळातील आहेत. ही नाणी यवन शहरात सापडली.

या नाण्यांना तुटलेल्या मातीच्या जाळीत जमा करण्यात आले होते. या जाळीला त्याकाळी गुल्लक समजले जात असे.

या खोदकामात एका विस्तृत औद्योगिक क्षेत्राची माहिती मिळाली, जे अनेकवर्ष सक्रिय होते. पुरातत्वशास्त्रज्ञांनाचा अंदाज आहे की ही सोन्याची नाणी कुंभाराच्या खाजगी गुल्लकमधील असतील.

Leave a Comment